जिल्ह्यातील 14 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह


जिल्ह्यातील 14 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर 145 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह


सातारा दि. 30 (जि. मा. का): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे उपचार घेत असलेल्या 14 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय महिला,


कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी येथील 40 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष , शिवडे येथील 36 वर्षीय पुरुष, तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 10 वर्षाचा मुलगा, विद्यानगर, सैदापूर येथील 26 वर्षीय महिला,मलकापूर येथील 26 वर्षीय पुरुष, नडशी येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.


145 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


एन.सी.सी.एस., पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 145 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.


तसेच 27 जून रोजी एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविलेल्या रिपोर्टमधील 55 वर्षीय पुरुष हा गोडोली येथील असल्याचे कळविले होते, परंतु त्याचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे ता. मावळ असल्याने या बाधिताची नोंद जिल्ह्यातून वगळण्यात आली आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


 


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज