जिल्ह्यात 10 नागरिक कोरोना बाधित तर यातील दोंघांचा मृत्युपश्चात रिपोर्ट कोरोनाबाधित


जिल्ह्यात 10 नागरिक कोरोना बाधित तर यातील दोंघांचा मृत्युपश्चात रिपोर्ट कोरोनाबाधित


सातारा दि. 14 (जि. मा. का): आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 10 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले असून यातील जावळी तालुक्यातील गांजे येथील 48 वर्षीय पुरुष व रविवार पेठ फलटण येथील 70 वर्षीय वृध्दा या 2 कोरोना बाधितांचा घरीच मृत्यू झाला असून त्यांचा रिपोर्ट मृत्यपश्चात पाझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


कोरोना बाधित रुग्णांमध्ये साताऱ्यातील शाहूनगर येथील 52 वर्षीय पुरुष.


कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, ग्रामीण रुग्णालयातील 53 वर्षीय महिला स्वच्छता कर्मचारी


जावळी तालुक्यातील गांजे येथील घरीच मृत्यू झालेला 48 वर्षीय पुरुष .


फलटण येथील मंगळवार पेठ येथील 62 वर्षीय सारीचा पुरुष, व रविवार पेठ येथील घरीच मृत्यू झालेली 70 वर्षीय वृध्दा.


खटाव तालुक्यातील वडगाव येथील 57 वर्षीय महिला, व बोंबाळे येथील 29 वर्षीय पुरुष


पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील 31 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


 


आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 738 झाली असून कोरोनातून 508 ब-या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 198 इतकी झाली आहे तर 34 जणांचा मृत्यु झालेला आहे