आण्णा सेवानिवृत्त होताना...... ‼️
आज 31/5/2020 रोजी न्यू इंग्लिश स्कुल,कवठेएकंद चे मुख्याध्यापक श्री. विलास महादेव साळुंखे उर्फ आण्णा सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा तसेच त्यांना निरोगी आयुष्य ,सुख समाधान लाभो ही सदिच्छा.
अण्णाची शिक्षक म्हणून सुरुवात 1990 साली गणेशवाडी शाळेतून झाली.तेथे 1 वर्ष काम करून ते न्यू इंग्लिश स्कुल सोनी या शाखेत गेले, जास्तीतजास्त त्यांची सेवा सोनी या शाखेत झाली. सोनी शाखेच्या जडणघडणीत त्या त्या वेळच्या मुख्याध्यापकांच्या बरोबर त्यांचा ही मोलाचा वाटा होता. श्री अंकुश हजारे हे सोनी शाखेच्या मुख्याध्यापक पदी असताना श्री साळुंखे सर व हजारे सर या जोडगोळीने तेथील स्टाफ ला हाताशी धरून अतिशय बिकट परिस्थितीत सोनी शाखा सांभाळली.
सोनीतुन मिरज , नंतर पदोन्नती ने ते मुख्याद्यापक म्हणून गणेशवाडी येथे रुजू झाले. एक विध्यार्थी प्रिय ,उत्कृष्ट विज्ञान शिक्षक म्हणून ते पाच ही शाखेत लोकप्रिय होते.तसेच त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाची उत्तम जाण होती त्याचे नेटके नियोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता. अतिशय मृदूभाषी,शांत संयमी स्वभावामुळे ते विद्यार्थ्यां बरोबरच पालकांच्यात ही लोकप्रिय होते.सर जेवढे शांत तेवढेच कर्तव्य कठोर, उत्तम प्रशासक ,कार्यालयीन कामाची जाण असणारे कमी कालावधीत त्यांनी एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून ठसा उमटविला. कवठेएकंद येथे मुख्याद्यापक म्हणून एक ते दीड वर्षाच्या कालावधीत संस्थेचे अध्यक्ष श्री मिलींद जाधव सर,सचिव श्री राहुल साळुंखे सर,श्री अंकुश हजारे सर यांच्या सहकार्याने त्यानी शाळेत बऱ्याच भौतिक सुविधेसह तेथील अडचणी सोडविण्यावर भर दिला.
आपली संस्था शंभरीच्या उंबरठ्यावर असताना सर सेवानिवृत्त होत आहेत याचे वाईट वाटते, पण सेवानिवृत्त झाल्यानंतर ही त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहील यात शंका नाही. माझी एक अपेक्षा आहे ज्या शाळेत त्यांनी जास्त सेवा केली त्या सोनी शाळेच्या उभारणीसाठी त्यानी जास्तीत जास्त वेळ द्यावा.
परत एकदा अण्णांना खुप साऱ्या शुभेच्छा💐
शब्दांकन: श्री अमोल आंबी