मुलांसाठी यु ट्युब वर बालशिबिराचे आयोजन


 


 मुलांसाठी यु ट्युब वर बालशिबिराचे आयोजन 


 वर्तमान परिस्थितीत समर्पण ध्यानाद्वारे संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याची कला. 


लाॅकडाऊनच्या काळात नैराश्यपूर्ण वातावरणात ध्यानाद्वारे स्वत:ला सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याची सुवर्णसंधी.आयुष मंत्रालयाकडून सामान्यजनांना ध्यान करण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला जात आहे.अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी घरातच राहून ध्यान शिकावे आणि सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या प्रेरणेने ह्या लाॅकडाऊनच्या काळात सगळ्यांना एक सकारात्मक सामूहिकता आणि वातावरण प्राप्त व्हावे या उद्देशाने दि.२४/०५/२०२० रोजी सकाळी ९:०० वाजता ६ वी ते १० च्या विद्यार्थ्यांनसाठी प. पु. गुरू माँ यांचे बालशिबिर आणि दि.२५/०५/२०२० रोजी सकाळी ७:३० वाजता प. पु. सद्गुरू श्री. शिवकृपानंद स्वामीजींचे ऑनलाइन मराठी बालशिबिराचे आयोजन केले आहे.


  तर चला जाऊया ... वर्तमान परिस्थितीत भरलेल्या नकारात्मकतेच्या वातावरणातून एका सकारात्मक दिशेकडे.


आपणा सर्वांस ह्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याची नम्र विनंती. 


(इयत्ता ६ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी मराठी शिबिराचा लाभ घ्यावा.)


तसेच युट्यूब वर खालील चॅनल सबस्क्राईब करा


http://www.shivkrupanandfoundation.org.