महाबळेश्वर मध्ये कोरोनाचा शिरकाव. आज दोन नवे रुग्ण.


सातारा जिल्ह्यात आज दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह. महाबळेश्वर मध्ये कोरोनाचा शिरकाव.


सातारा दि: कोरेगाव येथे पुण्यावरून आलेला 36 वर्षीय तरुण आणि मूळ महाबळेश्वर रहिवाशी मुंबईवरून आलेला 23 वर्षीय विद्यार्थी हे दोघेही आज  कोरोना बाधित आढळल्याचा आहवाल प्राप्त झाला आहे.  यामुळे महाबळेश्वरात काेराेनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान रात्री उशिरा पार्ले (ता. कऱ्हाड) येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल असणाऱ्या एका निकट सहवासिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या 118 वर गेली असून, यापैकी 94 रुग्ण उपचार घेत आहेत. 20 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला. एकट्या कऱ्हाड तालुक्‍यात 87 रुग्णसंख्या झाली आहे.