गृहराज्यमंत्री यांच्यावतीने पत्रकारांना अत्यावश्यक किटचे वाटप

 


गृहराज्यमंत्री यांच्यावतीने पत्रकारांना अत्यावश्यक किटचे वाटप


  नवारस्ता/प्रतिनिधी
 कोरोनासारखी गंभीर परिस्थिती ला अत्यंत धाडसाने  सामोरे जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे पत्रकार समाजातील ताज्या घटना सर्वसामान्य पर्यत पोहचविण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.अशा पत्रकारांच्या ही कुटुंबाना मायेचा आधार म्हणून पाटण विधानसभा मतदारसंघातील पत्रकारांना  राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या वतीने जीवनावश्यक अशा वस्तूंचे किट तयार करुन वितरण करण्यात आले.


      कोरोना आणि संचारबंदीचा फटका सर्वसामान्य जनतेसह पत्रकारितेला ही बसला आहे.प्रत्रकार हा समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहे.सर्वत्र भयानक परिस्थिती असताना ही पत्रकार मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून परिस्थितीचे  वार्तांकन करून दररोज आपल्या समोर वस्तुस्थिती सादर करीत आहेत.
अशा पत्रकारांच्या कुटुंबाला मायेचा आधार म्हणून राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील पत्रकारांना अन्नधान्याच्या किट चे वितरण केले.
   मंत्री देसाई यांच्या या मायेच्या आधारामुळे कराड पाटण तालुक्यातील पत्रकारामधून समाधान व्यक्त होत आहे.


   दरम्यान  या अगोदर नुकतेच मंत्री देसाई यांनी  पाटण मतदारसंघातील सुमारे ९५०० कुटुबांना आधार मिळणेकरीता अन्नधान्याचे  पॅकेट तयार करुन त्याचे वाटप केले  .


Popular posts
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या कराड तालुक्यात बंदची हाक.
इमेज
कुंभारगाव, चाळकेवाडी परिसरात वन्यप्राण्यांकडून शेळीवर हल्ला. दोन शेळ्यांचा घेतला जीव.
इमेज
युवा नेते यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त काळगाव व कुंभारगाव विभाग शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न‌.
इमेज
गोरखगड पाठोपाठ सह्यपुत्रांची हरिश्चंद्रगडाची मोहीम फत्ते.
इमेज
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्य सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजले पाहिजे : खा.श्रीनिवास पाटील
इमेज