कोरोना रुग्ण सापडलेल्या गावातील जनतेला दिलासा देणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई गांवागावात.


भालेकरवाडी,शितपवाडी,धामणी,भरेवाडी,


चाळकेवाडी व गलमेवाडी गांवाना दिल्या भेटी.


पाटण दि.२४ :- पाटण तालुक्यात आज तारखेला कोरोनाचे एकूण २५ रुग्ण सापडले असल्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेले दोन महिने कसलाही कोरोनाचा संसर्ग तालुक्यात नव्हता.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात बाहेरगांवाहून काही व्यक्ती तालुक्यात आल्यानंतर दोनचार दिवसापुर्वी कोरोनाचा चांगलाच प्रसार झाला असून कोरोना रुग्ण सापडलेल्या गांवाना भेटी देवून तेथील परिस्थितीची पहाणी करीत अधिकाऱ्यांना सतर्क ठेवण्याचे काम तालुक्याचे आमदार राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई करीत आहेत.त्यांनी आज तालुक्यातील ढेबेवाडी व कुंभारगांव भागातील भालेकरवाडी, शितपवाडी,धामणी, भरेवाडी,चाळकेवाडी (कुंभारगांव) व गलमेवाडी येथे कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या सहा गांवाना भेटी देवून प्रत्यक्ष फिल्डवर जावून येथील परिस्थितीची पहाणी केली व या गांवातील जनतेला दिलासा दिला देत प्रशासनाने अजुन सतर्क रहा अशा सुचना केल्या.


           गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दोन दिवसापुर्वी बनपुरी,ताईचीवाडी (शिरळ),म्हावशी या कोरोना रुग्ण सापडलेल्या गांवाना भेटी देवून तेथील पहाणी केल्यानंतर त्यांनी आज भालेकरवाडी, शितपवाडी,धामणी, भरेवाडी, चाळकेवाडी(कुंभारगांव) व गलमेवाडी याठिकाणीही तालुकास्तरीय अधिकाऱ्यासमवेत गावागांवात जावून भेटी दिल्या व येथील सर्व परिस्थितीची पहाणी केली. हायअलर्ट नामदार हे फिल्डवर येवून जनतेची विचारपुस करीत आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत हे पाहून या गांवातील ग्रामस्थांनी, महिलांनी ना.शंभूराज देसाईंचे जनतेची काळजी घेणारा नेता म्हणून कौतुक करुन त्यांचे विशेष आभारही मानले.


           दरम्यान या भेटीमध्ये त्यांनी गांवातील रुग्णांची विचारपुस करीत तालुका प्रशासनाच्या वतीने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना इन्स्टिटयुट कॉरन्टाईंन (विलगीकरण कक्ष) करण्यात आले आहे. आपणांस जीवनावश्यक वस्तू गावपोहोच करण्याच्या सुचना तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थांना काही अडचण येणार नाही. तसेच या सहाही गांवात जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी एक आरोग्य पथक तयार करुन दिवसातून एकदा गावात कुणाला ताप येत असेल, थंडी वाजत असेल तर त्या पथकाने गांवात येवून तपासणी करण्याच्याही सुचना केल्या आहेत. माहे मे महिन्यांचे स्वस्त धान्य सगळया गांवामध्ये पोहचविण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच गांवामध्ये ग्रामस्थांना २४ तास पाणी व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेशही संबधितांना देण्यात आले आहेत. त्यामुळे काळजी करु नका असा दिलासा त्यांनी कोरोना रुग्ण सापडलेल्या या सहा गांवातील जनतेला प्रत्यक्ष गांवात जावून दिला. तसेच या व्यतिरिक्त काहीही अडचण आली तर मला डायरेक्ट फोन करा माझा फोन नंबर तुमच्याकडे आहेच असेही त्यांनी हक्काने प्रत्येक गांवातील नागरिकांना सांगितले.