लॉक down आणि घरगुती हिंसाचार
"आजच सकाळी बातमी ऐकली की lock dowm सुरू झाल्या पासून घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात खूप वाढ झाली आहे..... this is very shocking news..... एकतर सार जग वैश्विक महामारीच्या विळख्यातून बाहेर पडू पाहतेय नि अजूनही आपण तद्दन बुरसटलेल्या अर्थहीन मानसिकतेला अजूनही कवटाळून बसलो आहोत नि विकृतपणे वागू पाहत आहोत... हे म्हणजे फारच भयंकर म्हणावं लागेल...!!
त्यावर उपचार करणारे समुपदेशन केंद्र व समुपदेशक यांच्या समुपदेशनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत...म्हणून त्यावर सध्याच्या परिस्थितीत तरी त्यांनी isolation(विलगीकरण)करण्याची नामी शक्कल लढवली जात आहे.हास्यास्पद वाटेल हे पण,तितकेच महाभयंकर नाही का वाटत हे??
सारे मूळ स्त्री-पुरुष ह्या भेदापलीकडे "मानसिकतेत"दडलेली आहे.जोवर मानसिकता नाही बदलत तोवर समानता,आधुनिकता वगैरे निव्वळ गावगप्पाच होय...!!
कोणीही कोणाचेही जगणं हिरावून घेणं..पशुवत वागवण हे निसर्गनियमाला नि माणुसकीला धरून नसतेच की..मग ती स्त्री असो वा पुरुष..!!
कुठेतरी हे थांबायला हवं.....ह्यात लॉक डाऊन...घडून...नात्यात ओलावा येणारा नि स्त्री-पुरुष म्हणून एकमेकांचा समान पातळीवर सन्मान करणारा "सुदिन"लवकर येवो ही सदिच्छा.!!
🖋️©️शुभा(कंदी पेढा)