कराड मध्ये आज पंधरा रूग्ण कोरोनामुक्त.


आज जिल्ह्यात पंधरा कोरोना मुक्त, जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना


सातारा दि. 11 ( जि. मा. का ): आज सातारा जिल्ह्यातील 15 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले. जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना आहे. यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे एकूण 15 रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे 15 कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या 15 जणांना आज घरी सोडण्यात आले.


कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 11 जणांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश  भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.


आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून 23 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे जिल्ह्यातील  एकूण 35 रुग्ण कारोना मुक्त  झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.


Popular posts
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभारगाव येथील त्रिपुरी पौर्णिमेची यात्रा रद्द.
Image
साताऱ्यात २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा व्यवस्थापनाला आदेश.
Image
कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी ; नागरिकांनी सूचनाचे पालन करावे, अन्यथा कारवाई करणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
पाटण तालुका पत्रकार संघामार्फत ढेबेवाडी विभागातील कोरोना योध्यांचा सन्मान.
Image
ना.शंभूराज देसाईंमुळे पाटण ग्रामीण रुग्णालय झाले उपजिल्हा रुग्णालय;100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास शासनाची मान्यता.
Image