कृष्णा हॉस्पिटलमधून आज आणखी ९ कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज


कृष्णा हॉस्पिटलमधून आज आणखी ९ कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज


म्हासोली येथील आणखी 5 जण कोरोनामुक्त


कराड, ता. २९ : कराड तालुक्यातील म्हासोली, इंदोली, भरेवाडी आणि मेरमेवाडी येथील एकूण ९ कोरोनामुक्त रुग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये म्हासोली येथील 5 कोरोनामुक्त रुग्णांचा समावेश असल्याने, सलग दुसऱ्या दिवशी म्हासोलीकरांना दिलासा मिळाला आहे. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमध्ये एकूण ७७ कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


 


वनवासमाची आणि मलकापूरनंतर हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोली गावातील ८ कोरोनामुक्त रुग्णांना गुरुवारी (ता. २८) डिस्चार्ज देण्यात आला. पण पुन्हा त्याच दिवशी रात्री आलेल्या अहवालात म्हासोली येथे पुन्हा ८ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोनामुक्तीचा आनंद फार काळ टिकला नाही.


 


दरम्यान, गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेली म्हासोली येथील ६० वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष आणि १२ वर्षीय मुलगी अशा ५ कोरोनाग्रस्त रुग्णांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. तसेच इंदोली येथील ३९ वर्षीय पुरुष, भरेवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय महिला, मेरमेवाडी येथील २३ वर्षीय पुरुष अशा अन्य ४ कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांनाही आज डिस्चार्ज देण्यात आला. 


 


यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. शशीकिरण एन. डी., डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. विश्वास पाटील, वैशाली यादव, नीता शेवाळे, नीता इनामदार, मंजुषा कुलकर्णी यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.


 


 


Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज