मंत्री शंभूराज देसाई यांची दुचाकीवरून सातारा शहरात रपेट; नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्या़ंकडून जाणून घेतला आढावा


मंत्री शंभूराज देसाई यांची दुचाकीवरून सातारा शहरात रपेट; नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्या़ंकडून जाणून घेतला आढावा.


प्रतिनिधी सातारा


राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई हे पायाला भिंगरी लावून जनतेसाठी धावत आहेत.आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघासह ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या वाशीम जिल्ह्यासह सर्वच ठिकाणी यंत्रणेला वारंवार सूचना देत आहेत.सातारा शहर लॉकडाऊन केल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांच्या त्याच दुचाकीवरून शहरात रपेट मारून पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना बळ दिले. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना जाणून घेत त्यांनी सूचना दिल्या.खास करून कंटेंटमेंट झोनचा त्यांनी लेखा जोखा घेतला.शहराच्या पाणी पुरवठ्याची चौकशी केली.


गतवर्षी महापुराचा फटका पाटण मतदारसंघाला बसला होता. यावेळी मंत्री देसाई यांनी जनतेसाठी भर पावसात अगदी तांबव्यापासून कोयनेच्या खोऱ्यात कधी त्यांची 7070 धाव घेत होती.ओढ्याना आलेल्या पुराच्या पाण्याखाली साकव गेले होते.दळणवळण ठप्प झाले होते तरी हे त्यावेळी जनतेची दुःख हलके करण्यासाठी त्यांना मदत देण्याकरिता पोहचत होते आता ही कोरोनाचा कहर बघता बघता गावच्या वेशीवर पोहचला.त्यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघात डेरवण येथे ही आला.पण मंत्री या नात्याने त्यांनी स्वतः जनतेच्या हिताकरता पायाला भिंगरी लावत मतदारसंघाच्या आरोग्य यंत्रणेला आणि पोलिसांना सतत पाठबळ देत,जनतेला आधार देण्याचे सातत्याने काम करत आहेत.


वाशीमचे पालकमंत्री या नात्याने तेथेही कोरोना मुक्त जिल्हा कसा राहील याकरता त्यांचे सतत लक्ष आहे. तेथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना ते वारंवार सूचना करत आहेत.त्यामुळे वाशिममध्ये कोरोनाच्या मुसक्या आवळण्यात यश येत आहे.खरीप हंगाम आढावा बैठक ही त्यांनी ऑन लाईन व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली.राज्याचे ग्रामीण गृहमंत्री या नात्याने त्यांची राज्याच्या पोलीस दलाचे मनोबल वाढविण्यासाठी सातत्याने सूचित करत आहेत.घडणाऱ्या घटनांमध्ये तात्काळ आदेश देऊन निपटारा करत आहेत.


पालिकेच्या दारात मंत्र्यांची दुचाकी


नुकताच दोन दिवसांपूर्वी सदरबझार परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.त्यामुळे प्रशासनाने सातारा शहर लॉक डाऊन केले आहे.या लॉक डाऊन मध्ये पालिका प्रशासनाने नेमकी काय उपाय योजना केली आहे?,याचा आढावा घेण्यासाठी एक मंत्री असून कोणतीही सुरक्षा न घेता सोशल डिस्टन्स पाळत त्यांची कॉलेजच्या काळातील दुचाकी पुन्हा बाहेर काढून सायकांळी  पालिका गाठली.सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे हे बाहेर पडतच असताना प्रवेशद्वारातच त्यांनी त्यांच्याकडून आढावा जाणून घेत त्यांना सूचना दिल्या.शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होतो की नाही, काही अडचण नाही ना,हे ही त्यांनी जाणून घेत त्यांनी कंटेंटमेंट झोन आणि बफर झोनमध्ये काय काय करता?,नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे, अशा ही सूचना त्यांनी दिल्या आहेत. 


मंत्री देसाई यांनी लावलेली भिरकीट पाहून जिल्ह्यातील जुन्या मंडळींना लोकनेते बाळासाहेब देसाई यांचीच आठवण आल्याशिवाय राहत नाही, अशी जुन्या जाणत्या मंडळींमध्ये चर्चा आहे.