प्रतिबंधित क्षेत्र वगळून केशकर्तनालय व ब्युटी पार्लर दुकाने सुरु करण्यास सशर्त परवानगी


प्रतिबंधित क्षेत्र वगळून केशकर्तनालय व ब्युटी पार्लर दुकाने सुरु करण्यास सशर्त परवानगी


            सातारा दि. 23 (जिमाका) : शासनाने पारित केलेल्या दि. 19 मे च्या आदेशामध्ये सातारा जिल्ह्याचा नॉन रेड झोन मध्ये समावेश्‍ केलेला आहे. या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळून काही अंशी सूट देण्यात आलेली आहे. त्यानुसार अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केशकर्तनालाय व ब्युटी पार्लर दुकानांमध्ये सेवा घेणाऱ्या ग्राहकाला मास्क लावता येत नसल्यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता जास्त असते म्हणून याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून खालील बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील.


            केशकर्तनालयामध्ये व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी रजिस्टर ठेवावे. या रजिस्टरमध्ये क्रमाक्रमाने येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी. त्याचप्रमाणे दुकानदाराने त्यांना संभाव्य वेळेची सूचना देवून त्याचवेळी पुन्हा येण्याची विनंती करावी. केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये या नोंदीच्या क्रमाने ग्राहकांना सेवा द्यावी. प्रथम ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा. केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर दुकानामध्ये कारागीर व ज्या व्यक्तीचे केश कर्तन, दाढी इ. करावयाची आहे अशा दोन व्यक्तीच दुकानामध्ये असतील. उर्वरित लोक दुकानाबाहेर थांबतील. मोठ्या सलून किंवा व्युटी पार्लरमध्ये दोन खुर्चीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर ठेवून अतिरिक्त कारागीराला काम करता येईल.


            सेवा घेणारी व्यक्ती ही मास्क लावू शकत नाही त्यामुळे केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणारी व्यक्ती यांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच सलून दुकानामध्ये किंवा ब्युटी पार्लरमध्ये एका ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकार राहील. त्याचप्रमाणे एका ग्राहकाला वापरेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरू नये. त्यासाठी ग्राहकांच्या संख्येइतके टॉवेल व कापडाची उपलब्धता दुकानदाराने करुन ठेवावी. काही सलून अथवा व्युटी पार्लरमध्ये फेस वॉशसाठी पाण्याच्या वाफेचा वापर केला जातो. त्यासाठी पाण्याचे वाफेत रुपांतर करण्याचे मशीन वापरले जाते. या मशिनवर लोखंडी किंवा स्टीलचे असलेली हत्याचे निर्जंतुकीकरण करता येईल. बाकीची हत्यारे ही सॅनिटायझरचावापर करुन निर्जंतुकीकरण करावे. दुकानामध्ये येणाऱ्या लोकांनी, दुकानाबाहेरील लोकांनी सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक राहील. दुकान, परिसरातील नियमित साफसफाई व स्वच्छता करावी व विशेष खबरदारी घ्यावी.


            वरील प्रमाणे दिलेल्यासूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास संबंधित दुकानधारकावर कडक कारवाई करण्यात येईल. दुकानामध्ये काम करणाऱ्या कारागीराने चेहऱ्यावर मास्क परिधान न केल्यास संबधित व्यक्तीवर रु. 500/- दंड आकारण्यात येईल तसेच दुकानामध्ये एका खुर्चीसाठी एका ग्राहकापेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 500/- दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंड आकारण्यात येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल.


शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास रु. 1000/- दंडाआकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास रु. 2000/- दंड आकारण्याता येईल व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी.


 तसेच भविष्यामध्ये जर जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी कोरानाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इंन्सिडंट कमांडंट तथा उपविभागीय अधिकारी हे त्या ठिकाणी नव्याने प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करुन वेगळा आदेश काढतील असेही आदेशात नमुद केले आहे.


Popular posts
मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या दौलतनगर येथे सभा. शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष
इमेज
"आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव ; मान्याचीवाडी ठरले जिल्हयातील स्मार्टग्राम.
इमेज
विनायक मेटे यांचा कार अपघातात अकाली मृत्यू! मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.
इमेज
कुंभारगाव येथे "हर घर तिरंगा "रॅली संपन्न.
इमेज