कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डची विभागीय आयुक्तांकडून पाहणी


कराड : कृष्णा हॉस्पिटलच्या भेटीप्रसंगी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील.


कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डची विभागीय आयुक्तांकडून पाहणी


कराड, ता. 9 : महाराष्ट्र शासनाचे पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आज कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वार्डची पाहणी केली. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांबद्दल त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे विशेष कौतुक केले.


याप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील उपस्थित होते.


चेअरमन डॉ. भोसले यांनी आयुक्त श्री. म्हैसेकर यांना कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वार्डाची माहिती दिली. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनासाठी 110 बेडचा स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला असून, रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र स्टाफ तैनात करण्यात आला आहे. या स्टाफला सर्व सुरक्षा साधने पुरविण्यात आली असून, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या स्टाफची राहण्याची व्यवस्था हॉस्पिटल  कॅम्पसमध्येच करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या चाचण्या करण्यास परवानगी मिळाल्याने येथेच चाचणी करून, लवकर निदान करणेही शक्य झाले आहे. 
आत्तापर्यंत 12 रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आम्हाला यश आले असून, अन्य कोरोनाबाधित सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी आमचे सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ प्रयत्न करत आहेत. यापैकी बऱ्याचशा रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. भविष्यात दुर्दैवाने रुग्णसंख्या वाढली तरी त्या रुग्णांना सामावून घेऊन, त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यास आमची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती चेअरमन डॉ. भोसले यांनी दिली. 


विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनांचे कौतुक करून, प्रशासकीय स्तरावरील अन्य मार्गदर्शक सूचना हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या. यावेळी अन्य डॉक्टर्स व शासकीय अधिकारी उपस्थित होते.


 


 


Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज