येळगांवात  शिवछत्रपती प्रतिष्ठान च्या चित्रकला स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद .


येळगांवात  शिवछत्रपती प्रतिष्ठान च्या चित्रकला स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद .


येळगांव ता.कराड येथे शिवछत्रपती प्रतिष्ठान च्या वतीने ऑनलाईन चित्रकला स्पर्धांचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते . या स्पर्धेला परिसरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सुमारे शंभरावर स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
 सध्या सर्वत्र कोरोनाव्हायरस ने धुमाकूळ घातल्याने संपूर्ण देशभर लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे सर्वांनाच घरातच बसून राहावे लागत आहे. या फावल्या वेळामध्ये त्यांच्यातील कलागुणांना चालना मिळावी यासाठी शिवछत्रपती प्रतिष्ठानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.प्रारंभी वय वर्षे १ ते ११ व १२ वर्षाच्या पुढील अशा दोन गटात ही स्पर्धा होणार होतीं. मात्र स्पर्धकांचा वाढता प्रतिसाद पाहता १ ते ११ वर्षे हा एक गट व १२ ते १६ वर्षे हा दुसरा गट आणि १७ वर्षावरील अशा तीन गटांमध्ये या स्पर्धा संपन्न झाल्या स्पर्धेसाठी सर्व गटांना छत्रपती शिवाजी महाराज हा एकच विषय देण्यात आला होता. त्याला स्पर्धकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक स्पर्धकांनी आपले एक चित्र काढून ते व्हाट्सअप द्वारे संयोजकांना पाठवावयाचे होते. चित्रे जमा झाल्यानंतर यामधून प्रत्येक गटामध्ये प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ असे नंबर काढण्यात आले. 
           स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे गट क्रमांक १( १ते ११ वर्षे ) प्रथम क्रमांक- कु.आकांक्षा दिलीप नायकवडी,द्वितीय क्रमांक- कु. शौऱ्या शैलेश मोकाशी, तृतीय क्रमांक- कु.श्रावणी विजय पवार उत्तेजनार्थ -धवल विकास पुजारी
    गट क्रमांक २(१२ ते १६वर्षे )प्रथम क्रमांक -कु.जिया समीर इनामदार, द्वितीय क्रमांक -हर्षवर्धन दिपक पाटील, तृतीय क्रमांक -चिन्मय प्रशांत शेवाळे उत्तेजनार्थ -समीर अशोक हिनुकले.
  गट क्रमांक ३ (१७ वर्षावरील) प्रथम क्रमांक-प्रथमेश रमेश साळूंखे,द्वितीय क्रमांक-सचिन दिनकर शेवाळे. तृतीय क्रमांक-योगेश भगवान शेटे,उत्तेजनार्थ -कु.निदा नईम इनामदार.
लॉकडाऊन उठल्यानंतर विजेत्यांना बक्षीस व सर्वाना प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून झुंजार पाटील, हणमंत कुंभार, अशोक गायकवाड यांनी काम पाहिले.कलाशिक्षक सुरेश जाधव सर यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे प्रशांत शेवाळे,प्रवीण पाटील, आकाराम शेटे,  संदीप शेटे, विजय पवार, सुरज पाटील, विराज शेटे यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.