विधान परिषदेला शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल .


विधान परिषदेला शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल


सातारा / प्रतिनिधी
 विधानपरिषदेच्या निवडणुकीकरता सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते


शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज सकाळी विधानभवनात मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी मध्ये पुन्हा नवचैतन्य आले आहे.
आज सकाळी शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगावचे.त्यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले आहे.1999च्या निवडणूकीत 12 हजार मतांनी जावलीचे आमदार म्हणून निवडून आले.2001 ला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर बिनविरोध संचालक, राष्ट्रवादी महाराष्ट्र कामगार युनियनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली.2004 ला पुन्हा जावळीत 44 हजारच्या मताधिक्याने आमदार म्हणून विजयी झाले.जानेवारी 2006 मध्ये राष्ट्रवादीच्या लेबर सेलचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.2009 च्या विधानसभेला कोरेगावातून 31 हजार 753 मतांनी विजयी होऊन आमदार झाले.विधिमंडळ मध्ये मुख्य प्रतोद झाले.ऑक्टोबर 2012 मध्ये पक्षाच्या प्रवक्ते पदी निवड झाली.जून 2013 मध्ये सातारचे पालकमंत्री झाले.ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत कोरेगावातून 47 हजार 247 मतांनी विजयी होत पुन्हा आमदार झाले. मे 2015 सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले. अशी सामाजिक कार्याची  भली मोठी यादी असणाऱ्या शशिकांत शिंदे यांचा विधानपरिषद उमेदवारीचा अर्ज आज विधानभवनात दाखल करण्यात आला.