कराड तालुक्यातील चार रुग्ण कोरोनामुक्त; आज सोडले घरी


कराड तालुक्यातील चार रुग्ण कोरोनामुक्त; आज सोडले घरी


सातारा दि. 26 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या म्हासोली ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 9 वर्षांची मुलगी, उंब्रज येथील 22 वर्षीय युवक आणि 53 वर्षीय पुरुष असे एकूण चार कारोना बाधित रुग्ण आज कोरोना मुक्त झाले असून त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. 


या चार रुग्णांची 14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या चार जणांना आज सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्ह्यात 336 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 जण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे


Popular posts
1543 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 38 बाधितांचा मृत्यू
इमेज
सातारा जिल्ह्यात 1212 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 41बाधितांचा मृत्यू
इमेज
सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाचा मोठा निर्णय ; जिल्ह्याला मिळणार 38 रुग्णवाहिका - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
इमेज
कराड चांदोली मार्गावर उंडाळे नजीक दुचाकी पुलावरून कोसळल्यामुळे भीषण अपघात. दोघे जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी.
इमेज
राज्यात 1 मेपर्यंत निर्बंध; नव्या नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?
इमेज