विंग येथील कोविड बाधित पुरुषाचा मृत्यू.

   विंग येथील कोविड बाधित पुरुषाचा मृत्यू, 


दोन मृत व्यक्तींसह 43 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर 167 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह


 


 सातारा दि. 30 (जिमाका): कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे विंग येथील कोविड बाधित तसेच किडनीचा आजार असलेला 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा रात्री दि. 29 मे रोजी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 कराड तालुक्यातील पाठरवाडी येथील 33 वर्षीय पुरुष व सातारा शहरातील बुधवार पेठ येथील 65 वर्षीय महिला यांचा काल दि.29 मे रोजी मृत्यु झाला आहे. या दोघांचा कोविड संशयित म्हणून घशातील स्त्रावांचा नमुने तपासणीकरिता, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


167 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह


एन.सी.सी.एस.पुणे यांनी 132 नागरिकांचे अहवाल व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी 35 नागरिकांचे अहवाल असे एकूण 167 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


43 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 43 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.