अंभेरी येथील एका बाधिताचा मृत्यु तर भाटकी येथील मृत व्यक्तीचे नमुने पाठविले तपासणीला 


अंभेरी येथील एका बाधिताचा मृत्यु तर भाटकी येथील मृत व्यक्तीचे नमुने पाठविले तपासणीला 


सातारा दि. 27 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारा मुंबई येथून प्रवास करुन अंभेरी ता. खटाव येथील 53 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु झाला आहे. या पुरुषाला तीव्र श्वसनदाह आजार होता. तसेच मुंबई येथून प्रवास करुन आलेला भाटकी ता. माण येथील 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला आहे. या 54 वर्षीय पुरुषाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


172 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 27, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 68, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 7 असे एकूण 172 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


आत्तापर्यंत जिल्ह्यात 394 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत. तर 255 रुग्णांवर उपचार सुरु असून 13 जणांचा मृत्यु झालेला आहे.


Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज