सातारा :
जिल्ह्यातील सातारा उपविभाग, वाई आणि कोरेगाव उपविभागातील लॉकडाऊनमूळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांसाठी मदत म्हणून श्रीनिवास पाटील फाऊंडेशन व पुनित बालन ग्रुप पुणे यांच्या वतीने १,००० धान्यांचे कीट वितरणासाठी सातारा उपजिल्हाधिकारी सौ. मोनिका सिंग ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.
या कीटमध्ये ५ किलो आटा, ५ किलो तांदूळ, १ लिटर खाद्यतेल, १ किलो तूरडाळ, २०० ग्रॅम चटणी यांचा समावेश आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो लोकांना उपजिवीकेचे साधनांची अडचण असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपल्या घासातला घास काढून अडचणीत सापडलेल्यांना मदत करणं हीच आज काळाची गरज आहे.