हायअलर्ट नामदार शंभूराज देसाई फिल्डवर.
कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या ढेबेवाडी व कुंभारगांव भागातील भालेकरवाडी, शितपवाडी,भरेवाडी,धामणी,गलमेवाडी व चाळकेवाडी या गावांत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून या सहा गांवातील जनतेची काही अडचणी नाहीत ना? प्रशासनाला सुचना दिल्या आहेत काही चिंता करू नका काळजी व खबरदारी घ्या अशी विचारपुस करीत दिलासा देण्याचे काम केले. तसेच काही अडचण आली तर मला डायरेक्ट फोन करा माझा फोन नंबर आहेच तुमच्याकडे असेही हक्काने सांगितले.