92 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 77 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
सातारा दि. 6 ( जि. मा. का ): क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 22, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 68, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 2 असे एकूण 92 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली .
77 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 34, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 38, ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 5 असे एकूण 77 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.