कराड येथील एक प्रवासी कोरोना बाधित; 74 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 104 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल.


कराड येथील एक प्रवासी कोरोना बाधित;


74 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 104 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


सातारा दि. 16 (जिमाका) : वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे पुणे येथून प्रवास करुन आलेला एका प्रवाशाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


74 जणांचा अहवाल निगेटिव्ह


तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय वाई येथील 9 असे एकूण 64 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे  बी. जे. वैद्य'कीय महाविद्यालय , पुणे यांनी कळविले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या 10 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, असे एकूण 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


104 जण विलगीकरण कक्षात दाखल


काल दि. 15 मे रोजी रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 40, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 64 असे एकूण 104 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.


आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 129 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्णांची संख्या 66 आहे. तर कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण 61 असून कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.