सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 7 व सातारा येथील 1 असे 8 बाधित आज कोरोना मुक्त


सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 7 व सातारा येथील 1 असे 8 बाधित आज कोरोना मुक्त


सातारा दि. 22 (जिमाका) : सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे 7 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल असणारा 1 असे एकूण 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे मलकापूर ता. कराड येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची ता. कराड येथील 40 व 60 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचारी, कराड येथील मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला, मलकापूर ता. कराड येथील 49 पुरुष व 45 वर्षीय महिला तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दहिवडी ता.माण येथील 25 वर्षीय युवक असे एकूण 8 जणं करोना मुक्त झाले आहेत.


 


  आत्तापर्यंत जिल्ह्यातील 114 नागरिक कोराना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.


Popular posts
मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या दौलतनगर येथे सभा. शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष
इमेज
"आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव ; मान्याचीवाडी ठरले जिल्हयातील स्मार्टग्राम.
इमेज
विनायक मेटे यांचा कार अपघातात अकाली मृत्यू! मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.
इमेज
कुंभारगाव येथे "हर घर तिरंगा "रॅली संपन्न.
इमेज