कृष्णा उद्योग समूहाच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत.


कृष्णा उद्योग समूहाच्या वतीने कराडचे तहसीलदार मा. अमरदीप वाकडे साहेब यांच्याकडे कोरोना बाधित भागातील गरजू लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे किटस आज देण्यात आले. तसेच देशहितार्थ अविरत कार्यरत राहणार्‍या पोलीस बांधवांच्या सुरक्षिततेसाठी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलपती मा. एस. ये. माशाळकर साहेब यांच्या हस्ते डीवायएसपी ऑफिसचे मा. शेलार साहेब यांच्याकडे सॅनिटायझर सुपूर्त केले. मोठ्या जिद्दीने व मेहनतीने कार्यरत राहणार्‍या या बांधवांना सर्वतोपरी मदत व्हावी हा माझा प्रयत्न आहे.