उंडाळे व घोगांव तलाव असे पाण्याविना कोरडे ठणठणीत पडले आहेत .
वाकुर्डे योजनेचे पाणी कराड दक्षिण मधील घोगांव तलावात सोडावे: तमाम शेतकऱ्यांची मागणी.
उंडाळे/ प्रतिनिधी.
कराड दक्षिण मधील बळीराजा अडचणीत आला आहे. उंडाळे आणि घोगांव ही पाणीसाठ्याची दोन्ही तलाव पूर्णपणे कोरडी पडलेलेली आहेत. या तलावातील पाण्यावरील असणारी शेकडो एकर जमिनीवरील शेती पाणी टंचाईमुळे अडचणीत आली आहे. पाण्याविना शेतीतील पिके वाळून जात आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे कराड दक्षिण मधील अनेक गावच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अगोदरच कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच पाणीटंचाईमुळे शेतातील पिके ही धोक्यात आली आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील शेतकरी त्रस्त झाला आहे. यामुळे शासनाने वाकुर्डे योजनेचे पाणी शक्य तितक्या लवकरात लवकर कराड दक्षिण मधील उंडाळे व घोगांव या तलावांमध्ये सोडावे. व शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान टाळावे. अशी मागणी तमाम शेतकऱ्यांनी केली आहे.
गतवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता. कराड दक्षिण मधील सर्व तलाव तुडुंब भरले होते. परंतु मे महिन्यात कडक उन्हाळ्यात कराड दक्षिण मधील घोगांव, उंडाळे ,येवती येथील धरणातील पाणी पातळी प्रचंड खालावली असून या धरणातील पाणी खूपच कमी झाले आहे. त्यामुळे या भागातील सर्व पिके तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरींना पाण्याची टंचाई भासत असून बळीराजाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. अनेक गावातील ग्रामपंचायत विहिरीत पाणी पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
तसेच तलावही आटले असून शेतातील बागायत पिके ऊस ,भुईमूग वाळत आहेत. एकिकडे अनेकांच्या मोटारी धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर उपसा करत असून दुसरीकडे धरणाखालील शेतकर्यांची पाण्याविना शेती वाळून जात आहे. ही शोकांतिका आहे.
ही शेती वाचवायची असेल तर प्रतिवर्षी प्रमाणे वाकुर्डे योजनेचे पाणि लवकरात लवकर कराड दक्षिण मधील घोगांवच्या तलावात सोडून पिके व पाणीटंचाई दूर करण्यात यावी यासाठी बळीराजा मागणी करत असून प्रशासनाने, व लोकप्रतिनिधींनी लवकर उपाय योजना करून शेती व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. यासाठी वाकुर्डे योजनेचे पाणी कराड दक्षिण मधील घोगांव तलावात सोडावे हीच कराड दक्षिण मधील तमाम शेतकऱ्यांची अपेक्षा व मागणी आहे.