कराड  मध्ये आणखी एक रुग्ण कोरोना बाधित . तर 58 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह.


कराड  मध्ये आणखी एक रुग्ण कोरोना बाधित . तर 58 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह.


283 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल.


 सातारा दि. 4 ( जि. मा. का ): वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या एका नागरिकाचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 


आता सातारा जिल्ह्यात 69 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 80 बाधित रुग्ण आढळले आहेत.


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 16, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 4, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 14, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 21, कोरेगाव 3 असे एकूण 58 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.


तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 66, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे  75 व बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतर नमुने 10 असे एकूण 85, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 90, उपजिल्हा रुग्णालय, फलटण 26 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव 26 असे एकूण 293 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपाणीसाठी पाठविण्यात आले आहे,  अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  गडीकर यांनी दिली आहे. 


Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज