जिल्ह्यातील 52 नागरिकांचा रिपोर्ट आले पॉझिटिव्ह तर दोन बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 52 नागरिकांचा रिपोर्ट आले पॉझिटिव्ह तर दोन बाधितांचा मृत्यु


सातारा दि. 27 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 52 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहेत. तसेच वाई तालुक्यातील असले येथील मुंबई वरून आलेला मधुमेह असलेला 67 वर्षीय कोविड बाधित रुग्ण याचे निधन झाले आहे आणि जांभेकरवाडी ता. पाटण येथील 70 वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.


या बाधित रुग्णांमध्ये माण तालुक्यातील म्हसवड येथील 48 वर्षीय पुरुष, तोंडले येथील 58 वर्षीय पुरुष, भालवडी 62 वर्षीय पुरुष (मृत्यु), लोधवडे येथील 34 वर्षीय व 28 वर्षीय महिला.


 


खटाव तालुक्यातील वांझोली येथील 52 वर्षीय पुरुष व अंभेरी येथील 14 वर्षीय युवक.


 


सातारा तालुक्यातील खडगाव येथील 48 वर्षीय पुरुष, जिमनवाडी येथील 21 वर्षी युवक कुस बुद्रुक 45 वर्षीय महिला. वाई तालुक्यातील आकोशी येथील 58 वर्षीय पुरुष, आसले येथील 40 वर्षीय पुरुष, मालदपूर येथील 24 वर्षीय पुरुष, देगाव येथील 55 वर्षीय महिला, सिद्धनाथवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, धयाट येथील 52 वर्षीय पुरुष.


 


पाटण तालुक्यातील धामणी येथील 35 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष जांभेकरवाडी 70 वर्षीय महिला, गमलेवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, मान्याचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, मोरगिरी येथील 58 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, आडदेव येथील 35 वर्षीय पुरुष.


 


खंडाळा तालुक्यातील अंधोरी येथील 72 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा, घाटदरे येथील 47 वर्षीय महिला, पारगाव येथील 27 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 50 वर्षीय दोन पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष.


जावली तालुक्यातील सावरी येथील 39 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला व 7 वर्षांची मुलगी, केळघर येथील 16 वर्षीय युवक 44 वर्षीय पुरुष.


महाबळेश्वर तालुक्यातील कासरुड येथील 26 वर्षीय पुरुष व 18 वर्षी युवक, देवळी येथील 9 वर्षाचा मुलगा, 42 वर्षीय पुरुष व एक महिला, गोळेवाडी येथील 42 वर्षीय महिला.


कराड तालुक्यातील खराडे येथील 45 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 20 वर्षीय युवती.


फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 21 वर्षीय महिला.


तसेच एन.सी.सी.एस. पुणे यांनी 97 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे तर क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 59 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


आत्तापर्यंत जिल्ह्यात 394 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत. तर 257 रुग्णांवर उपचार सुरु असून 11 जणांचा मृत्यु झालेला आहे.