52 वर्षीय निकट सहवासित कोरोना बाधित; 47 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 89 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


52 वर्षीय निकट सहवासित कोरोना बाधित;


47 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 89 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


सातारा दि. 12 (जिमाका) :   कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाचा निकट सहवासित 52 वर्षीय पुरुष कोरोना बाधित (कोविड-19 ) असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


47 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 3,  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील एक, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 22 व उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 21 असे एकूण 47 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


89 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 43, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 22, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 7, व कोरेगांव येथे 17 असे एकूण 89  जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.


  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 122 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 84, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 35, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.


Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज