मलकापूर ता. कराड येथील 47 वर्षीय बाधिताचा मृत्यु


मलकापूर ता. कराड येथील 47 वर्षीय बाधिताचा मृत्यु;


230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 27 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 सातारा दि. 28 (जिमाका): पनवेल येथून प्रवास करुन आलेला मलकापूर ता. कराड येथे स्वत:च्या मालकीच्या घरात राहत असणारा (मुळ गाव बाचोली ता. पाटण) येथील 47 वर्षीय पुरुषाला अस्वस्थ वाटत असल्याने 21 मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती हा कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. या बाधित रुग्णाचा आज पहाटे मृत्यु झाला आहे. या रुग्णाला सुरुवातीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह  


            एन.सी.सी.एस. पुणे यांनी 191 तर कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 39 असे एकूण 230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, असेही शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


27 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


            क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27 जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.


आत्तापर्यंत जिल्ह्यात 422 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत. तर 281 रुग्णांवर उपचार सुरु असून 15 जणांचा मृत्यु झालेला आहे.


Popular posts
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
अंजली माधवराव चव्हाण यांचे दुःखद निधन
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
श्री मळाईदेवी पतसंस्थेची दहा टक्के लाभांश परंपरा कायम : शेतीमित्र अशोकराव थोरात.
इमेज
गृहपाठ बंद झाले, आता शिक्षणच बंद करा : अशोकराव थोरात
इमेज