'कोरोना वॉरियर्स'च्या हस्ते विशेष सन्मान करत कृष्णा हॉस्पिटलमधून आज 4 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज


'कोरोना वॉरियर्स'च्या हस्ते विशेष सन्मान करत कृष्णा हॉस्पिटलमधून आज 4 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज


कराड, ता. 12 : येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आज 4 कोरोनामुक्त रुग्णांना अनोख्या पद्धतीने डिस्चार्ज देण्यात आला. नेहमीप्रमाणे आज सर्व कोरोनामुक्त रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज तर देण्यात आलाच; मात्र यावेळी या कोरोनामुक्त रूग्णांचा सत्कार करण्याचा बहुमान कोरोना विशेष वार्डमध्ये सेवा बजाविलेल्या 'कोरोना वॉरियर्स'ना देण्यात आला.
 
कोरोना काळात देवदूत ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये अनेक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ सेवा बजावित आहे. या स्टाफने दाखविलेल्या धैर्यामुळे आजपर्यंत कृष्णा हॉस्पिटलला एकूण 27 रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे.


या नर्सिंग स्टाफच्या धैर्याला सलाम करण्यासाठी नुकत्याच झालेल्या जागतिक नर्सिंग दिनाचे औचित्त साधून आज कोरोना वार्डात सेवा बजावलेल्या डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफला कोरोनामुक्त रुग्णांचा सत्कार करण्याचा बहुमान प्रदान करण्यात आला.


कृष्णा हॉस्पिटल मधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये वनवासमाची येथील 56 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला आणि मलकापूर येथील 75 वर्षीय महिला व 16 वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे. या सगळ्यांना टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. या रुग्णांचे हॉस्पिटलच्या प्रांगणात आगमन झाल्यावर कोरोना वॉर्डमध्ये सेवा बजावलेल्या 'कोरोना वॉरियर्स'च्या हस्ते या चौघांचाही सत्कार करण्यात आला. 


यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता. 


 


Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज