कृष्णा हॉस्पिटलमधून 3 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज 'कोरोना वॉरियर्स'ना कृष्णा हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांकडून मानवंदनाकृष्णा हॉस्पिटलमधून 3 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज


'कोरोना वॉरियर्स'ना कृष्णा हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांकडून मानवंदना


कराड, ता. 15 : येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आज 3 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कोरोनामुक्त रुग्णांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच यावेळी कृष्णा हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांकडून 'कोरोना वॉरियर्स'ना मानवंदना देण्यात आली. 


कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये कराड रुक्मिणीनगर येथील 28 वर्षीय महिला, मलकापूर येथील 55 वर्षीय महिला आणि वनवासमाची येथील 74 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 


या सगळ्यांवर हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ आणि सुरक्षा रक्षकांकडून फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांचे हॉस्पिटलच्या प्रांगणात आगमन झाल्यावर सुरक्षा रक्षकांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 


यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता. 


आज डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये रुक्मिणीनागर कराड येथील 28 वर्षीय महिलेचा समावेश आहे. कॉटेज हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी ही महिला दाखल झाली असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यावेळी त्या महिलेला कॉटेजमधून कृष्णा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. आता ती कोरोनामुक्त झाली आहे. आज तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या काळजीमुळे मी पूर्णपणे बरी झाले असून, आता समाजाने आमच्याकडे वेगळ्या नजरेने न पाहता, आम्हालाही आपल्यात सामावून घ्यावे, असे भावनिक आवाहन या महिलेने केले. 


 


Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज