27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट आला कोविड बाधित; 27 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह


27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट आला कोविड बाधित; 27 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह


मृत्यू पश्चात एका रुग्णासह 216 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


       रायगाव आणि खावली कोरोना केअर सेंटर मधून आज 11 जणांना डिस्चार्ज


 


सातारा दि. 30 (जिमाका) : कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे साकुर्डी येथील 27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट कोविड बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


27 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


 


          जिल्ह्यातील 27 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.


 


मृत्यू पश्चात एका रुग्णासह 216 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


          क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 3, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 38, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 5 ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 77, ग्रामीण रुगणालय, खंडाहा येथील 60, ग्रामीण रुगणालय, कोरेगाव येथील 9 व रायगाव येथील 24 असे एकूण 216 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामीण रुगणालय, वाई येथे वाई तालुक्यातील आंबेदरे आसरे येथील 43 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर कोविड संशयित म्हणून नमूना तपासणीकरीता पुणे येथे पाठविण्यात आला असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


 


रायगाव येथील 3 आणि 8 खावली येथील कोरोना केअर सेंटर मधून एकूण 11 जणांना डिस्चार्ज. 


आज रायगाव आणि खावली येथील कोरोना केअर सेंटरमधून 11 जणांचे 14 दिवसानंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये ता. खटाव मधील मायणी येथील 1, डिस्कळ येथील 1,ता. कोरेगाव मधील न्हावी बुद्रुक येथील 1, वारणानगर येथील 3, शेंद्रे येथील 1, ता. खंडाळा मधील कवठे जवळे येथील 1, अजनुज येथील 2,ता. वाई मधील आसरे येथील 1 रुग्ण.


आज दिवसभरात एकूण 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता जिल्ह्यात कोरोनातून 158 रुग्ण बरे झाले आहेत.