24 में अखेर ई-पास घेवून 1 लाखापेक्षा अधिक नागरिक सातारा जिल्ह्यात दाखल.


24 में अखेर ई-पास घेवून 1 लाखापेक्षा अधिक नागरिक सातारा जिल्ह्यात दाखल. 


सातारा दि. 25(जिमाका): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशामधून तसेच महाराष्ट्र राज्याच्या इतर जिल्ह्यातून 24 मे अखेर ई-पास घेवून 1,09,604 नागरिकांनी चेक पोस्टवरुन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे.  


यामध्ये देशातील आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश,उत्तराखंड, ओडिसा, कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, दादरा आणि नगर हवेली, पंजाब, पश्चिमबंगाल, बिहार,मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हरियाना मधून 2,184 नागरिकांनी प्रवेश घेतला आहे. तर 1,07,420 हे राज्यातील इतर जिल्ह्यातून आले आहेत.


सातारा जिल्ह्यात प्रवेश करुन विविध तालुक्यात गेलेल्यांची संख्या तालुका निहाय पुढीलप्रमाणे- कराड-12671, कोरेगाव-6113, खंडाळा-4804, खटाव-11676, जावळी-8192, पाटण-12463, फलटण-7457, महाबळेश्वर- 6588, माण-10341, वाई-8985 व सातारा तालुका-20314 अशा एकूण 1,09,604 नागरिकांनी विविध तालुक्यात प्रवेश केला आहे.


 


Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज