मलकापूर येथून राजस्थानचे नागरिक एसटी बस मधून सातारा कडे रवाना करताना हिरवा झेंडा दाखवून निरोप देताना मलकापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व इतर मान्यवर.
मलकापूर शहरातून 200 नागरिक रेल्वेने राजस्थानकडे रवाना.
मलकापूर दि.भारतामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता केंद्र शासनाने दि. 24 मार्च, 2020 पासून संपुर्ण देशामध्ये लॉकडाऊन केलेले आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, उद्योग धंदे, रोजगार, कारखाने, बांधकामे, घरकामे बंद असलेमुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना काम नसलेमुळे त्यांच्यावर आर्थिक टंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परराज्यातील कामगार व नागरिक त्यांच्या घरी परत जाणेसाठी मलकापूर नगरपरिषदेकडे सातत्याने वाटपुरावा केला होता.
मलकापूर नगरपरिषदेने शहरातील एकूण 9 प्रभागनिहाय नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्यामार्फत परप्रांतीय लोकांचे सर्व्हेक्षन केले होते. त्यामध्ये 1431 परप्रांतीय आढळून आले आहेत. या सर्वांचे रोजगार, उद्योग धंदे बंद असलेने नगरपरिषदेने त्यांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप केले होते. तसेच भोजन पॅकेट व्यवस्था सेवाभावी संस्थांमार्फत करुन शासनाचे शिवभोजन थाळी अंतर्गत शहरातील मलकापूर फाटा, ढेबेवाडी फाटा व यादव आर्केड या ठिकाणी 150 नागरिकांना भोजन वितरण करणेत आले आहे.
परप्रांतीय नागरिकांच्या मागणी प्रमाणे मलकापूर नगरपरिषदेने मा. जिल्हाधिकारी, सातारा, मा.उत्तम दिघे, उपविभागीय अधिकारी, कराड, मा. अमरदिप वाकडे, तहसिलदार, कराड यांच्या माध्यमातून राजस्थान मध्ये जाणाऱ्या परप्रांतीय नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करुन ती शासनास सादर केली होती. त्यानुसार 257 पात्र नागरिकांनी मलकापूर नगरपरिषद व महसुल विभागाकडे अर्ज केले होते. त्यानुसार रेल्वेने बुधवार, दि.13/05/2020 रोजी दुपारी 1.00 वाजता सातारा रेल्वे स्थानक येथून रेल्वे प्रवासाची सोय केली आहे.
या अनुषंगाने मलकापूर शहरातील 200 नागरिकांना मलकापूर नगरपरिषद व महसुल प्रशासन यांचेवतीने सातारा रेल्वे स्थानक या ठिकाणी पोहच करणेची सोय सकाळी 7.00 वाजता मलकापूर फाटा येथून महाराष्ट्र राज्य पहिवहन महामंडळाचे एस.टी. बस ने करणेत आली. यावेळी मलकापूर नगरपरिषद व महसुल प्रशासन यांनी संबंधित नागरिकांना भोजन पॅकेट, पाणी बॉटल, मास्क यांचे वाटप करणेत आले. जेणेकरुन प्रवासामध्ये संबंधित नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही.
यावेळी मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, उपनगराध्यक्ष श्री. मनोहर शिंदे, मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी, बांधकाम सभापती श्री. राजेंद्र यादव, नगरसेवक/नगरसेविका, स्वयंसेवक श्री.अभिजीत शिंदे, श्री.पंडित घारे, श्री.विलास पवार, मंडल अधिकारी श्री.पी.डी. पाटील व गावकामगार तलाठी श्री.सचिन निकम तसेच प्रभाग निहाय नोडल अधिकारी व आरोग्य विभाग व प्रशासन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मा. अमरदिप वाकडे, तहसिलदार, कराड यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत बसला हिरवा ध्वज दाखवून बस रवाना केली. मलकापूर नगरपरिषदेने तत्परतेने परप्रांतात जाणेची सोय केल्यामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तींना भेटणे शक्य झाले आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी राजस्थानकडे जाणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली व या बद्दल मलकापूर नगरपरिषदेस व महसुल प्रशासनास धन्यवाद देऊन आभार मानले.
मलकापूर येथील मंडईच्या मोकळ्या जागेत राजस्थान साठी जमलेले नागरिक.