विलगीकरणातील 2 पुरुषांचे  आणि कोरोना केअर सेंटर मधील एकाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह 


विलगीकरणातील 2 पुरुषांचे  आणि कोरोना केअर सेंटर मधील एकाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह 



सातारा दि. 15 (जिमाका) : सातारा येथील बाधिताचे निकट सहवासीत म्हणून विलगीकरणात दाखल असलेले दोघे वय वर्षे 40 आणि 47 यांचे आणि मुंबई वरून  प्रवास करून आलेला कोरेगाव तालुक्यातील एक 29 वर्षीय युवक  11 तारखे पासून कोरोना केअर सेंटर मध्ये होता. या तिघांचे 
अहवाल हे कारोनाबाधित आल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
  29 वर्षीय युवक विनापरवानगी मुंबई येथून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते.  
आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 128 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्णांची संख्या 65 आहे. तर कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण 61 असून कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.


Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज