कृष्णा हॉस्पिटलमधून 2 कोरोनामुक्त पेशंटना टाळ्यांचा गजरात डिस्चार्ज.


कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील दोन रुग्ण आज कोरोना मुक्त होऊन पडले बाहेर


सातारा दि. 4 ( जि. मा. का ) आज कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील कोरोना बाधित असलेले दोन रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडले आहेत.


मोठ्या उत्साहात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. उत्तम आरोग्यासाठीच्या सदिच्छा घेतल्यानंतर  सर्वांचे आभार व्यक्त   करून हे दोन रुग्ण त्याच्या घरी गेले.  पुढचे चौदा दिवस त्यांना घरीच इतरांपासून अलिप्त ( होम कोरंटाईन ) राहावे लागेल.