कृष्णा हॉस्पिटलमधून 2 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

 



कृष्णा हॉस्पिटलमधून 2 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज


कराड, ता. 25 : येथील कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या वनवासमाची येथील 24 वर्षीय युवक आणि 75 वर्षीय वृद्ध महिला या दोन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 56 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


 


कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी या कोरोनामुक्त रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.


 


 


Popular posts
मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या दौलतनगर येथे सभा. शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष
इमेज
"आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव ; मान्याचीवाडी ठरले जिल्हयातील स्मार्टग्राम.
इमेज
विनायक मेटे यांचा कार अपघातात अकाली मृत्यू! मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.
इमेज
कुंभारगाव येथे "हर घर तिरंगा "रॅली संपन्न.
इमेज