2 रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित; 67 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 142 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

 2 रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित;


67 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 142 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


सातारा दि. 12 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे ठाणे येथून प्रवास करुन आलेला एक 20 वर्षीय युवक व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे निगट सहवासित म्हणून दाखल असणारा 29 वषीय पुरुष असे एकूण 2 जणांचे अहवाल कोरोना बाधित (कोविड-19 ) आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


67 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 26, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 19  व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 17 असे एकूण 67 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


142 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 9 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 133  असे एकूण 142 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.


 


  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 121 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 84, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 35, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.


Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज