2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर एका रुग्णाचे नाव समाविष्ट;
एकूण 3 रुग्ण बाधित.
सातारा दि. 9 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मुंबई वरुन प्रवास करुन आलेला 23 वर्षीय युवक व पुणे येथून प्रवास करुन आलेला 8 मे ला विलगीकरण कक्षात दाखल केलेला 36 वर्षीय पुरुष असे एकूण 2 जण कोविड-19 बाधित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.
तसेच सातारा येथील 50 वर्षीय कॅन्सरपिडीत रुग्ण उपचारासाठी पुणे येथे गेला असता तो कोविड बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने आय. सी. एम. आर. पोर्टलमध्ये सातारा जिल्ह्याच्या यादीमध्ये त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 3 नवीन कोविड-19 बाधित रुग्णांची नोंद झाली असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
वरील अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 119 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 97, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 20, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.