कराड तालुक्यात 2 व सातारा तालुक्यात 2 नवे रुग्ण पॉझिटिव्ह.


कराड तालुक्यात 2 व सातारा तालुक्यात 2 नवे रुग्ण;


54 वर्षीय मृत व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 214 जणांचे नमुने पाठविले तपासणील


 


सातारा दि. 28 (जिमाका): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारा कराड तालुक्यातील विंग येथील 50 वर्षीय पुरुष व तामिणी ता. पाटण येथील 7 वर्षीय मुलगी कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला आहे. तसेच सातारा येथील खासगी प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आलेल्या परळी ता. सातारा येथील 21 व 48 वर्षीय पुरुषांचे रिपोर्टही बाधित आले असून असे आज एकूण 4 बाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


दि. 26 मे रोजी जिल्हा रुग्णालय, सातारा येथे मृत्यु झालेल्या 54 वर्षीय पुरुषाचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविले आहे. 


 


214 जणांच्या घातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला


 


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 13, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 64, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 61, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 24, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 6 व शिरवळ येथे कोविड केअर सेंटरमधील 30 असे एकूण 214 जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


 


आजपासुन क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे Truenat Machine द्वारे कोविड-19 ची चाचणी करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


आत्तापर्यंत जिल्ह्यात 426 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 134 रुग्ण बरे झाले आहेत. तर 277 रुग्णांवर उपचार सुरु असून 15 जणांचा मृत्यु झालेला आहे.