काल रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार 2 रुग्ण कोरोना बाधित;   130 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 81 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


काल रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार 2 रुग्ण कोरोना बाधित;


  130 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 81 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


सातारा दि. 13 (जिमाका) : दहिवडी येथे कोविड केंद्रात दाखल असणाऱ्या गुजरात अहमदाबाद येथून प्रवास करुन आलेल्या एका 25 वर्षी पुरुष व कराड येथील सैदापूर कोविड केंद्रात दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिलेचा असे एकूण 2 जणांचे कोरोना बाधित (कोविड-19 ) अहवाल काल दि. 12 मे रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


130 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 24, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 51, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 15, ग्रामीण रुग्णालय, फलटण येथील 7, ग्रामीण रुग्णाल, कोरेगाव 18, ग्रामीण रुग्णालय, वाई 15 असे एकूण 130 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


  81 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 4 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 77 असे एकूण 81 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.


  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 124 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 87, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 35, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.