स्वामी विवेकानंद विचार मंच सेवा संस्थेचे ची सामाजिक बांधिलकी.

सणबुर येथील युवकांची सामाजिक बांधिलकी


ढेबेवाडी दि. सणबुर तालुका पाटण येथील मुंबईस्थित युवकांनी समाजसेवेचे कार्य करण्याच्यादृष्टीने, संकटकाळी समाजातील गरजूंना मदत व्हावी या सामाजिक बांधिलकीतून एकत्र येऊन स्वामी विवेकानंद विचार मंच सेवा संस्था मुंबई या नावाने सेवा संस्था स्थापन केली.


सध्या राज्यावर कोरोनाचे महाभयानक संकट आहे. लॉकडाऊन च्या या काळात अनेक गरीब लोकांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणीतून जीवन जगावे लागत आहे. अशा गरीब गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत या संस्थेकडून करण्यात आली आहे. ज्या गरजू, गरीब लोकांना अशा संकट समयी मोलाची मदत मिळाली म्हणून या लोकांनी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.