18 वर्षीय युवक व 59 वर्षांचा पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह.


18 वर्षीय युवक व 59 वर्षांचा पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह


सातारा दि. 7 ( जि. मा. का ): खावली येथील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या  18 वर्षीय युवक आणि कराड येथील कोरोना बाधिताचा 59 वर्षीय  निकट सहवासित पुरुषाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


18 वर्षीय युवक हा तीन दिवसांपूर्वी विनापरवानगीने मुंबईहून आला होता. पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सातारा तालुक्यातील खावली येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये त्याला ठेवण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. हा मुलगा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल पुणे येथून प्राप्त झाला आहे.  तर कराड येथील 59 वर्षीय पुरुष हा कोरोना बाधित व्यक्तीचा निकट सहवासित आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 114 झाली असून इतकी आहे. या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 98, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 14, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण  आहेत.


Popular posts
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
अंजली माधवराव चव्हाण यांचे दुःखद निधन
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
श्री मळाईदेवी पतसंस्थेची दहा टक्के लाभांश परंपरा कायम : शेतीमित्र अशोकराव थोरात.
इमेज
गृहपाठ बंद झाले, आता शिक्षणच बंद करा : अशोकराव थोरात
इमेज