सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा, 16 कोरोनामुक्त; कोरोनामुक्तचा आकडा पोहोचला 61 वर


सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा, 16 कोरोनामुक्त;


कोरोनामुक्तचा आकडा पोहोचला 61 वर


सातारा दि. 15 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक आरोग्य कर्मचारी, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथील 12 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 3 असे एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


सध्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 22, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे 13 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 26 असे एकूण 61 जण उपचार घेत आहेत. यापैकी 60 रुग्ण लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित एका रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.


47 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह


तसेच उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 6 व  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 41 एकूण 47 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.


28 नागरिक विलगीकरण कक्षात


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 17, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 11 असे एकूण 28 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.


                जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 125 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 62, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 61, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.


Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज