श्री संतकृपा शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 लाख 51 हजार रुपयाची मदत.


श्री संतकृपा शिक्षण संस्थेचा कोरोना लढ्यासाठी मदतीचा हात.


 


घोगांव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने व येथील कर्मचाऱ्यांच्या वतीने मिळून एक लाख 51 हजार रुपयाची मदत (covid-19) मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता देण्यात आली. देशावर कोरोना सारख्या महाभयानक संसर्गाचे संकट आहे. महाराष्ट्रात या संकटाची छाया गडद होत चाललीआहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाने १लाख रुपये व संस्थेतील काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ५१, ०००(51 हजार रुपये) जमा करून संस्थेकडे सुपूर्द केले..मुख्यमंत्र्याच्या या आवाहनाला प्रतिसाद देत एक लाख 51 हजार रुपये चा धनादेश संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला.


श्री संतकृपा शिक्षण संस्था सदैव सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक फी मध्ये सवलत व इतर अनेक सवलती देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली केली आहेत. कोरोना च्या या लढ्यासाठी व राज्यावरील या संकटमय काळात संस्थेच्या वतीने व संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने केलेली मदत खरोखर कौतुकास्पद आहे. संस्थेचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज