मुंबईवरून प्रवास करून आलेल्या एक कोरोना बाधित आणि एक अनुमानिताचा मृत्यू


मुंबईवरून प्रवास करून आलेल्या एक कोरोना बाधित आणि एक अनुमानिताचा मृत्यू


सातारा दि. 25 (जिमाका): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आज वाई तालुक्यातील आसले येथील 70 वर्षीय मधुमेह असलेल्या कालच कोरोनाबाधित म्हणून आढळून आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाई तालुक्यातील जांबळी येथील 52 वर्षीय मधुमेह असलेल्या पुरुषाचा मृत्यू झाला असून कोरोना अनुमानित म्हणून त्याचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


   मृत्यू झालेले दोघेही मुंबईवरुन प्रवास करुन आलेले होते. त्यांना मधुमेह व श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


184 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 64, वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुगणालय कराड येथील 55, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 48 व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 5 अशा एकूण 184 अनुमानित नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.


Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज