ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे सरसावले .

 जनरल प्राक्टिनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडे फेस शिल्ड संच सुपूर्त करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले.......
सातारा, जावळी तालुक्यातील डॉक्टरांना फेस शिल्ड दिले भेट 
सातारा- संपूर्ण जगाला कोरोना या महाभयंकर विषाणूने विळखा घातला असून आपल्या देशातही कोरणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत ग्रामीण भागात रुग्णांवर उपचार करणाऱ्या  डॉक्टर्सना कोरोनाचा सर्वात जास्त धोका  संभवतो. त्यामुळे सातारा व जावली तालुक्यातील क्लिनिक, दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले सरसावले असून कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने सातारा आणि जावळी तालुक्यातील डॉक्टरांना त्यांनी स्वखर्चातून फेस शिल्ड भेट दिले आहेत. 
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचे दवाखाने, क्लिनिक रुग्णसेवेसाठी सुरु आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागातील डॉक्टरांना कोरोना होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे सातारा आणि जावळी तालुक्यातील डॉक्टरांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वखर्चातून या डॉक्टरांना अत्याधुनिक फेस शिल्ड उपलब्ध करून दिली आहेत. याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी  जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. जयदीप चव्हाण यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा केली होती. सातारा व जावली तालुक्यातील डॉक्टरांच्या संख्येबाबत त्यांनी माहितीही घेतली होती. असोसिएशनकडून सातारा आणि जावळी तालुक्यातील डॉक्टरांची यादी प्राप्त झाल्यांनतर आ. अशिवेंद्रसिंहराजे यांनी या डॉक्टरांसाठी फेस शिल्ड उपलब्ध करून दिली आहेत. 
मंगळवारी सकाळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी हि फेस शिल्ड  जनरल प्रॅक्टिसनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय यादव, माजी अध्यक्ष डॉ. जयदीप चव्हाण, सचिव डॉ. तुषार पिसाळ, जावळी तालुकाध्यक्ष डॉ. विलास फरांदे, डॉ. अभिराम पेंढारकर या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली. 
असोसिएशनच्या मागणीनुसार ५०० फेस शिल्ड आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पदाधिकाऱ्यांकडे दिली असून असोसिएशनमार्फत ही फेस शिल्ड सातारा आणि जावळी तालुक्यातील डॉक्टरांना पोहोच केली जाणार आहेत. या मदतीबद्दल ग्रामीण भागातील डॉक्टरांच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.