ट्रम्प यांनी मोदींना दम दिला, मोदींनी त्यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलं- आमदार : पृथ्वीराज चव्हाण .


मुंबई  : हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन हे औषध निर्यात न करण्याचा निर्णय हा आधीच घेतलेला असणार. मात्र अमेरिकेला या औषधाची गरज भासली आणि त्यांनी नरेंद्र मोदींना दम दिला की, औषध द्या नाहीतर त्याचे परिणाम भोगायला तयार रहा, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.


      आता खरं तर त्या दोघांना हे फोनवर गुपचूप हे करता आलं असतं पण आपण किती शक्तिशाली आहोत हे दाखवण्यासाठी ट्रम्पनी ते जाहीरपणे केलं आणि मोदींनी मग त्यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलं, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.  


  कोरोना रोगावर आपण नियंत्रण मिळवू पण नंतर आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यायचं आहे, अशी आठवण करून देत अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी भारत सरकारने जीडीपीच्या 100 टक्के कर्ज काढावं, असंही मत चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.


मलेरियासाठी असलेल्या औषधाच्या निर्यातीला आपल्याकडे बंदी होती, परंतु अमेरिकेला या औषधाची गरज करोनामुळे लागली आणि ट्रम्प आणि मोदी यांच्यात संवाद झाला. मात्र हा संवाद फक्त दोघांमध्ये न होता. जाहीर झाला आणि ट्रम्प यांनी मोदींना दम दिल्याचे व मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर लोटांगण घातल्याचे दिसून आलं असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.