सातारा चार जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह;३१ अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल .


सातारा दि. 11 ( जि. मा. का ):  जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या चार अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. तसेच  श्वसन संस्थेचा तीव्र जंतु संसर्गामुळे 3 ते 55 वर्ष वयोटातील  6 नागरिकांना (3 पुरुष व 3 महिला), दिल्ली येथून प्रवास करुन आलेल्या 20 ते 46 वर्ष वयोगटातील तीन पुरुषांना, मुंबई येथून प्रवास करुन 23 ते 28 वर्ष वयोगटातील तीन पुरुष असे एकूण 12 अनुमानितांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयस्तरावरील कोविड कक्षामध्ये वाई 3, कोरेगाव येथे 8, कराड येथे 6 व  फलटण येथे 2 असे 19 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  या सर्व 31  जणांच्या घाशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपसणीसाठी पाठविण्यात आले आहेत .  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे . 


Popular posts
पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपविरुद्ध लढण्यासाठी दिल्लीतून दिली मोठी जबाबदारी.
इमेज
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
सातारा जिल्ह्यात 195 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित तर 2 बाधिताचा मृत्यु
इमेज
सातारा जिल्ह्यात 182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
इमेज