कराड तालुक्यातील शेतकऱ्यांचे फुल शेतीचे लाखोचे नुकसान : बळीराजा अडचणीत


उंडाळे / प्रतिनिधी 
कोरोना चा संसर्गा रोखण्यासाठी देऊळ बंद राहिल्याने देवाला वाहण्यासाठी वापरण्यात येणारी फुले शेतातच राहिल्याने कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी फुलाचे शेतीवर नांगर फिरवला.
 महाराष्ट्रात गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून कोरोना  संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने संपूर्ण  देशात  संचारबंदी (144 कलम )  लागू करण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक सर्व ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घातल्याने चित्रपटगृहे, मॉल ,देवालय यासह सार्वजनिक ठिकाणी जिथे गर्दी  होईल अशी सर्व ठिकाणी बंद करण्यात आली. याचा फटका ग्रामीण भागातील बळीराजाला बसला देऊळ बंद राहिल्याने कराड तालुक्यातील शेतकरीवर्गाने पिकवलेली फुले यांना मागणी नसल्यामुळे शेतात तयार झालेली फुले कुठे विकायची या समस्या पोटी शेतकरी चितेत पडला होता. त्यातच शिवाय आज उद्या  बाजारपेठ सुरू होईल या आशेवर तयार फुले 
 शेतात  ठेवून होता. 
       प्रशासनाने  बंद 14 एप्रिल पर्यत जाहिर केला होता  त्यामुळे   14 एप्रिल नंतर बाजारात फुले नेता येतील या आशेवर शेतकरी थांबला. पण 14 एप्रिल नंतर प्रशासनाने कोरोनाचा  वाढता प्रसार रोखण्यासाठी पुन्हा तीन मे पर्यंत 21 दिवसाचा  लाँकडाऊन जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे गंभीर पेचप्रसंग उभा राहिला. शेतात तयार झालेला झेंडू फुलाचा माल बाजारपेठेत जाणार नाही या निराशेच्या गर्तेत शेतकऱ्याने सरळ झेंडूच्या  फुलावर टँक्टर घालून   नांगर फिरवला. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून उत्पादित केलेला झेंडू फुलाचा माल शेतकऱ्याला डोळ्यासमोर मातीत गाढण्याची वेळ आली.   
   बाजारपेठ बंद असल्याने   शेतकर्‍यांचे या फुलशेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्याने फुलासाठी केलेला   एक रुपयाही खर्च परत न मिळाल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला. शिवाय आर्थिक अडचणीत आला  अडचणीत आलेल्या    शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 
    शेतकऱ्यांना   झेंडूच्या पुलासाठी एकरी किमान एक लाख  रुपयाचे उत्पन्न  मिळते. पण कोरोना मुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतात घातलेला एक रुपयाही    खर्चही पदरात पडला नाही. शिवाय तयार केलेली बाग मातीत बुजवण्यासाठी पुन्हा मशागतीचा वाढीव खर्च आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी   जीवापाड   डोळ्यासमोर जपलेली झेंडूची बाग मातीत घातली तेव्हा डोळ्यातील अश्रूना मोकळी  वाट करून दिली.